उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोना (कोविड 19) या साथरोगाच्या लढाईत समाजाची बांधिलकी या नात्याने पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुखीम सिद्दिकी, जनरल मँनेजर प्रशांत सुलाखे, व्यवस्थापक फिरोज शेख, ज्ञानेश्वर भोसले, संजय भुतेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
 
Top