काटी /प्रतिनिधी-
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे,भूकेल्यांना अन्नदान करावे ही कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची विचारधारा घेऊन कुठलाही प्रकारचा मतभेद, जातिभेद, राजकारण न करता गावातील अपंग, निराधार, गोरगरीब लोकांना उपासमारी सारख्या  समस्येला सामोरे जाऊ नये यासाठी तुळजापूर तालुक्यातील काटी येथे बुधवार दि.(6) रोजी सायंकाळी 7 वाजता येथील ग्रामपंचायत सदस्य मकरंद देशमुख आणि जितेंद्र गुंड यांच्या वतीने 40 गरजू, अपंग, वृध्द, विधवा, हातवर पोट असणाऱ्या  कुटुंबांना 15 दिवस पुरेल एवढे गहू, तांदूळ,तेल,मीठ,हळद, मिरची,साखर, चहापत्ती, शेंगदाणे या वस्तुंचा समावेश असणाऱ्या किराणा साहित्याच्या किटचे वाटप सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा माजी सरपंच विक्रमसिंह देशमुख, बापूसाहेब देशमुख, विद्यमान सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करित साहित्याचे वाटप करून उर्वरित लाभार्थ्यांना घरपोच किराणा साहित्याचे किट दिले.
कोरोनाच्या या संकट काळात आणि लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर या दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने गावातील 40 गरजू गोरगरिब कुटुंबाना मदतीचा हात मिळाला असून सध्या कोरोना परिस्थितीमुळे व लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड या दोन ग्रामपंचायत सदस्यांनी माणुसकीच्या भावनेतून 40 गरजू कुटूंबांना केलेल्या मदतीमुळे चांगलाच आधार झाला असून लाभार्थ्यामधून समाधान व्यक्त होत आहे. गावातील गोरगरीब समाजाचे आपणही काही देणे लागतो या निरपेक्ष भावनेतून किराणा साहित्याचे वाटप करताना गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावरील आनंद हा आत्मिक समाधान देणारा असल्याची भावना ग्रा.प‌. सदस्य मकरंद देशमुख व जितेंद्र गुंड यांनी व्यक्त केली.
यावेळी सोसायटीचे विद्यमान चेअरमन तथा माजी सरपंच विक्रमसिंह देशमुख, बापूसाहेब देशमुख, विद्यमान सरपंच आदेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड,अनिल सतिश बनसोडे, बाळासाहेब भाले, अहमद पठाण, माजी सैनिक श्रीकांत गाटे, तानाजी हजारे,पंकज भापकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top