तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या जिल्हा प्रवेश बंदी पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असताना  सोलापूर जिल्हयालगत असलेल्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे तेवीस व तामलवाडी येथे एक अशा २४ इसमावर पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिस स्टेशन तालुक्यातील जिल्हा बंदी असताना विना परवाना उस्मानाबाद जिल्हयात प्रवेश केल्या प्रकरणी चोवीस जणांवर  शनिवार दि2रोजी दाखल करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  जिल्हधिकारी यांचे जिल्हा बंदी आदेश लागू असताना देखील काही इसम विनापरवाना उस्मानाबाद  जिल्हा हद्दीत प्रवेश केल्याने डॉ. दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर यांचे मार्गदशनाखाली तुळजापूर उपविभागात पोलिस ठाणे नळदुर्ग येथे दि 2.5.2020 रोजी 4 गुन्हे 23 इसमावर व पोलीस ठाणे तामलवाडी येथे 01 व्यक्तीवर 01 गुन्हा असे भारतीय दंड संहिता कलम 188,269 सह महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना कायदा कलम 11 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले

 
Top