उस्मानाबाद /प्रतिनिधी-
गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण जगामध्ये  कोरोणाचा कहर झालेला आपल्याला दिसून येतो आहे त्यामुळे लोकांचे बेहाल झालेले आहेत लोकांना अडचण होऊ नये म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी भारतातील लोकांना भरपूर मदत केली आहे तशाच प्रकारे देशातील अन्य राज्यांनी आपापल्या राज्यातील लोकांना मदत केली आहे पण या उलट महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील लोकांना कसल्याही प्रकारची मदत केलेली दिसून येत नाही याच्या उलट लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे काम घरपोच दारू घेऊन केले जात आहे त्यामुळे आणखी कोरोनामध्ये वाढ झालेली आहे तसेच पेरणी हंगाम जवळ आलेला असताना शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची मदत केली नाही तरी तातडीने शेतकऱ्यांना पेरणीपूर्व बियाणे खते त्यांच्या बांधावर मोफत देण्यात यावे कारण शेतकऱ्यांची ही अवस्था दयनीय झालेली आहे, घरपोच दारू बंद करण्यात यावी व इतर नागरिकांनाही पैसे वा अन्नधान्य देऊन किमान त्यांना जगता आले पाहिजे अशा प्रकारची मदत करावी या कोमात गेलेल्या सरकारने महाराष्ट्रातील सर्व थरातील लोकांना तातडीने मदत करावी अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केली आहे
 
Top