लोहारा/प्रतिनिधी
राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना या आपत्ती विरोधात लढण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाय योजना करण्यात अपयशी झालेल्या राज्य सरकारच्या विरोधात भाजपा प्रदेश सरचिटणीस विधान परिषदचे मुख्य प्रतोद आ. सुजितसिंह ठाकुर, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले.
 भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, भाजपा शहराध्यक्ष रहिमान (दादा) मुल्ला, काशीनाथ घोडके, बालासिंग बायस, दगडु तिगाडे, हाजी बाबा शेख, माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, शंकर मुळे, कल्याण ढगे, संतोष कुंभार, विजय महानूर, नागु लोहार , भाजयुमाे  विदयार्थी माेर्चा तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, संताेष फरिदाबादकर, प्रशांत संगशेटटी, लक्षमण भाेरे, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेरा आंगण मेरा, रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.
भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक यांनी स्वत:च्या घरी, गॅलरीत, अंगणात सोशल डिस्टन्स पालन करुन घरातील सदस्यांसह एकत्र येवुन तोंडाला काळा मास्क, काळा रुमाल, डोक्याला काळी ओढणी बांधुन काळ्या फिती लावुन काळे कपडे परिधान करुन निषेधाचे काळे फलक व विविध मागण्यांचे फलक हातात घेवुन राज्य सरकारचा जाहिर निषेध केला.
 
Top