उमरगा  /प्रतिनिधी-
कोरोनाचा विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय धोरणानुसार काम करणार्‍या आशा कार्यकर्तींना राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी डाॅक्टर सेलच्या वतीने गुंजोटी येथे फेस शिल्ड मास्कचे गुरुवार (दि.२१) वाटप करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार, मा. खा. सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील , ना. राजेश टोपे,डाॅ.सेलचे प्रदेश अध्यक्ष श्री.नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेलफेअर ट्रष्टतर्फे राज्यातील आरोग्य सेवकांना फेसशिल्ड मास्कचे वाटप करण्यात येत आहे. देशासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. आशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी व अशा कार्यकर्ती आपले जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. गुंजोटी येथील नागरी दवाखान्यात आशा कार्यकर्तीना याचे वाटप करण्यात आले. यावेळी गुंजोटी नागरी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जाधव, आरोग्यसेवक अमोल पाटील, आरोग्यसेविका उर्मिला पाटील, औषध निर्माण अधिकारी संजय झिंगाडे, गुंजोटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेंद्र गायकवाड, रोहन पवार, युनूस सौदागर, प्रभात शिंदे, हाजीसाब सय्यद, ज्येष्ठराज चव्हाण, हरीश शिवनेचारी आरोग्य कर्मचारी धोंडप्पा साखरे, मन्मथ फुलारी व आशा कार्यकर्ती उपस्थित होते.

 
Top