उमरगा  /प्रतिनिधी-
माकणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दररोज कमालीची गर्दी होत आहे. दोन कर्मचारी आणि आठ गावातील नागरिकांची गर्दी या मुळे काम करणाऱ्या वर मोठा लोड येत आहे.महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत २० मार्च  पासून सुरू झालेल्या लॉकडाऊन  मूळे नागरिकांची वाढत असलेली  गर्दी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यावर  मोठा बोजा पडला आहे.
लोहारा तालुक्यातील माकणी हे मोठे गाव आहे. त्यातच ही बँक  आठ गावांना जोडली आहे  त्यात माकणी,चिंचोली(का),करजगाव, हराळी, धानुरी ,तोरंबा, सालेगाव, चिरखापाटी, दत्तनगर ,  हे गावे समाविष्ट आहेत या संपुर्ण गावचे व्यवहार याच   बँकेवर करावे लागतात गावांमध्ये कुठलीही राष्ट्रीयीकृत बँक नाही तसेच लॉकडाऊन मूळे या शाखेचे शाखा अधिकारी हे त्याच्या  राहत्या गावी सोलापूर  येथे अडकलेले आहेत त्यांची उणीव मात्र ग्राहकांना येथील तरुण कर्ममचारी  सचिन मिलमिले व श्रीकांत नाईक  हे पडू देत नाहीत  ग्राहकांना स्वतःह लाईन मधे येऊन  पैसे देण्याचे काम  करीत अहेत त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.  बँकेचे सेवक जयप्रकाश पटणे, सरपंच विठ्ठल साठे व सर्व सदस्य हे देखील बँकेत होत असलेल्या गर्दी  कमी करण्यास  सातत्यानी मदत  करीत आहेत
 
Top