उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्ह्यासाठी शुक्रवारचा दिवस धक्कादायक ठरला असून उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका मयत रुग्णाचा मरणोत्तर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉराजाभाऊ गलांडे यांनी दिली.
हा ६० वर्षीय रुग्ण मुंबई येथून आला होता त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा स्वब घेण्यात आला मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून उस्मानाबाद जिल्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या २ झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात एक महिला उमरगा तालुक्यातील मुरुम येथील असून ती सुद्धा मुंबई येथून आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कारी येथील ७५ वर्षीय कोरोना रुग्णांसह वाशी तालुक्यातील लिंगी पिंपळगाव येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णावर जिल्हा प्रशासन विशेष उपचार करीत असून हे दोघेही मुंबई येथून आले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण सायंकाळी मयत झाला असून तो उमरगा तालुक्यातील बेडगा येथील रहिवासी आहे.60 वर्षीय हा रुग्ण कांदिवली मुंबई येथून आला होता त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यांनतर 21 मे रोजी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा मृत्यू झाला, या रुग्णाला रक्तदाब, दमा व मधुमेहाचा त्रास होता. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 64 रुग्ण असून त्यापैकी 15 जण बरे झाले आहेत तर ४७ जणांवर उपचार सुरु आहेत तर २ जण रुग्ण मयत झाले आहेत.
 
Top