तेर /प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कन्टेलमेंट झोन भागातील सर्व्हेक्षण करताना आशा स्वयंसेविकांना सरंक्षण देण्याची मागणी आशा स्वयंसेविकानी तेर ग्रामपंचायतीकडे निवेदनाव्दारे केली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 29 मे ला कंन्टेलमेंट झोन भागातील आरोग्य तपासणी सर्व्हे करीत असताना कांही व्यक्तीकडून मज्जाव करण्यात आला तसेच शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यामुळे आम्ही आरोग्य सर्व्हेसाठी जोपर्यंत आम्हाला सरंक्षण मिळत नाही तोपर्यंत त्या भागातील सर्व्हे करणार नाहीत.तरी आशा स्वयंसेविकांना सरंक्षण देण्याची मागणी आशा स्वयंसेविकानी तेर ग्रामपंचायतीकडे निवेगनाव्दारे 29 मे ला केली आहे.

 
Top