नळदुर्ग /प्रतिनिधी-
नळदुर्ग येथील आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने दि.२९ मे रोजी कोरोनावर उपयुक्त ठरत असलेल्या व कोरोनापासुन बचाव करणाऱ्या आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे नळदुर्ग शहरांतील आरोग्य विभागांतील कर्मचारी, डॉक्टर, पत्रकार तसेच अत्त्यावश्यक सेवेत काम करणारे न.प.चे कर्मचारी, व कांही नागरीकांना मोफत वाटप करण्यात आले.
आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आहे सध्या कोरोनाच्या संकटामुळे नागरीक भयभीत झाले आहेत. सरकारसह प्रशासन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनावर कुठल्याच प्रकारचे औषध सध्यातरी उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या कोरोनामुळे आज जगात लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. आजही कोरोनाचा आजार आटोक्यात आलेला नाही.कोरोनावर कुठलेच औषध नाही मात्र होमिओपॅथीचे आर्सेनिकम अल्बम ३० हे औषध कोरोनावर गुणकारी ठरत आहे. आर्सेनिकम अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचा डोस कोरोनापासुन बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. ज्याला केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आर्सेनिकम अल्बम ३० हे औषध रोगप्रतिकार शक्ती वाढवुन कोरोनाशी लढणाऱ्या अँटिबॉडी तयार करते या औषधाची कुठल्याही प्रकारची साईड इफेक्ट नाही. नळदुर्ग येथील आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे कोरोना काळातील काम अतीशय उल्लेखनीय आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शहर व परीसरातील शेकडो नागरीकांना मोफत मास्क, सॅनिटायजर,हँडवॉश वाटप करणे लॉकडाऊनच्या काळात गरजु गरीब असंख्य कुटुंबाना अन्न धान्य, भाजीपाला तसेच किराणा मालाच्या किटचे वाटप करणे, पोलिस, पत्रकार, आरोग्य विभागातील कर्मचारी व न.प.कर्मचाऱ्यांना मोफत मास्क,सॅनिटायजर व हँडवॉशचे वाटप करण्याचे काम आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने एक सामाजिक बांधिलकी म्हणुन केले आहे संस्थेचे हे काम उल्लेखनिय व प्रशंसनीय आहे. कोरोनाचा बचाव करण्यासाठी होमिओपॅथीचे आर्सेनिकम अल्बम ३० हे औषध गुणकारी ठरत आल्याचे लक्षात आल्यानंतर आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने बाजारातुन हे औषध उपलब्ध करून दि.२९ मे रोजी नळदुर्ग शहरांतील आरोग्य विभागांतील कर्मचारी, पत्रकार, तसेच अत्त्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या न.प.कर्मचाऱ्यांना आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप केले.
जवळपास ५५० नागरीकांना एक महीना पुरेल इतक्या गोळ्यांचे वाटप संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे. पत्रकार विलास येडगे व संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारी यांच्या हस्ते या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार, उपाध्यक्ष विशाल डुकरे, मयुर महाबोले व सुरज आवटे आदीजन उपस्थित होते. या गोळ्या मोठया व्यक्तींसाठी सकाळी अनशापोटी चार तर पाच वर्षाखालील मुलांना दोन गोळ्या सलग तीन दिवस घ्यावे लागणार आहे. महिन्यातुन फक्त तीन दिवस असे तीन महिने या गोळ्या घ्याव्या लागणार आहेत. सध्या आम्ही दिलेल्या गोळ्या एक महिन्यासाठीच्या आहेत इतर दोन महिन्यांच्या गोळ्या पुन्हा संस्थेच्यावतीने देण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव श्रमिक पोतदार यांनी म्हटले आहे.
 
Top