तेर (प्रतिनिधी ) भारतासह महाराष्ट्र राज्यात कोरोना या महाभयंकर महामारीचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर गर्दी न करता  गावपातळीवर आत्मा अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकरी गट  बीज उत्पादन कंपन्यांकडे नोंदणी करून त्यांच्याकडूनच बियाणे व खते खरेदी करावे असे आवाहन कृषी उपसंचालक अभिमन्यू काशीद यांनी केले आहे .
उस्मानाबाद तालुक्यातील हिंगळजवाडी येथे  महिला शेतकऱ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शेतीशाळेत खरीप पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमात काशीद बोलत होते मागील वर्षी काढणीपुर्व व काढणीपश्चात   पडलेल्या पावसामुळे  सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले त्यात शेतकऱ्यांचे सोयाबीन मोठ्या प्रमाणावर भिजल्याने यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणांची टंचाई  होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले नाही अशानी घरचेच सोयाबीन बियाणे पेरण्यासाठी वापरावे असे आवाहनही उपसंचालक काशीद यांनी केले .यावेळी कृषी सहाय्यक व्ही .पी . लेणेकर यांनीही उपस्थित महिला शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्यापूर्वी त्याची उगवण क्षमता कशी तपासणी करायची याविषयी मार्गदर्शन केले. मृद चाचणी  व मृदसंवर्धन आधिकारी दिपक दहिफळे यांनीही उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास कृषी सहायक सुमीत सोनटक्के , कोमल कटकटे , कौशल्या कटकटे ,  रेखा शिंदे , आदिंसह महिला शेतकरी उपस्थीत होत्या .

 
Top