नळदुर्ग /प्रतिनिधी-
सुमेरु सामाजिक संस्था अणदुर व ग्रामपंचायत कार्यालय मानेवाडी यांच्या संयुक्त विदयमाने दि. २२ व २३ मे रोजी मानेवाडी गावातील सर्व नागरीकांच्या तापमानाची तापमान मापक यंत्राव्दारे करण्यात आली. यामुळे सर्व नागरीकांच्या तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. सुमेरु सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे यांच्या नेतृत्वाखाली ही तापमानाची तपासणी करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये व संभाव्य आजारी असणाऱ्या माणसाला ताबडतोब उपचार घेण्यासाठी याचा फायदा होणार आहे. यावेळी सामाजिक अंतर ठेवून प्रत्येक नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान तापमान तपासणारा व्यक्ती कोणाच्याही घरी न जाता सर्व नागरीकांची तपासणी त्यांच्या घराबाहेर करुन घेतली. सर्व नागरीकांनी ही याला चांगला प्रतिसाद देत आपल्या दाराच्या उंबरठया बाहेर येवून सामाजिक अंतराचे भान ठेवून सर्वांनी आपल्या तापमानाची तपासणी करुन घेतली. यावेळी सुमेरु सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र कानडे यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा बददल योग्य ते मार्गदर्शन करुन सर्वांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले शिवाय सर्वांनी सामाजिक अंतराचे पालन करीत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले तर कोरोना विषाणू आपल्या गावामध्ये प्रवेश सुध्दा करणार नाही त्यामुळे सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे असे यावेळी त्यांनी म्हटले. यावेळी सरपंच शांताबाई सगट, उपसरपंच मनोहर माने, शहाजी हाके, आप्पा गडदे, सुनिल कटके, अमोल सगट, रेवप्पा बरवे, ग्रामसेवक होळकर, मुख्याध्यापक प्रशांत मिटकर, सहशिक्षक आण्णप्पा सर्जे, वाघमारे अश्विनी, सुमीत्रा पांढरे यांच्यासह अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या उपस्थीत होते. दरम्यान यावेळ या सर्व मान्यवरांनी होम कॉरंटाईन केलेल्या गावातील चाळीस जणांना भेटी देवून त्यांच्या आरोग्याची चौकशी करुन त्यांना काळजी घेण्याचे आवाहन ही यावेळी  सर्वांनी केले.
 
Top