लोहारा/प्रतिनिधी
सध्या जगभरात कोरोना या साथीच्या रोगाने जगभरात थैमान घातले याची खबरदारी म्हणून भारतात गेले ४६ दिवस झाल टाळेबंदी आहे. यामुळे ज्यांची हातावर पोट आहेत अशा कुटुंबाना हाताला काम नसल्याने खुप मोठ्या आर्थिक आणि इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याची जाणीव ठेऊन भारतीय जनता पार्टी उमरगा यांच्या वतीने भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ. राणाजगजितसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीनजी काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष  दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा शहरात व तालुक्यातील गरीब आणि वंचित लोकांना जीवनावश्यक वस्तुचे संच भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व भाजपा तालुकाध्यक्ष कैलास दादा शिंदे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे व भाजपा तालुकाध्यक्ष कैलास दादा शिंदे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष माधव पवार, समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, उपनगराध्यक्ष राजु गायकवाड, सिद्धेश्वर माने, अमर वरवटे, इराप्पा घोडके, नगरसेवक अरुण इगवे, गोविंद घोडके, उमेश स्वामी अनिल बिराजदार, किरण रामतीर्थे, उपस्थित होते .
 
Top