परंडा /प्रतिनिधी : -
परंडा (जि. उस्मानाबाद) तालुक्यातील सरणवाडी येथील कोरोना स्वॅब तपासणी अहवाल पाॅझिटिव आलेल्या एका रूग्णावर परंडा येथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वॅब तपासणी अहवाल येण्याआधीच काल आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, परिविक्षाधिन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक,डाॅक्टरस् यांच्याशी संपर्क करून खबरदारीच्या उपाययोजना करून बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्यांची सूची करून माहिती संकलित करण्याच्या सूचना केल्या होत्या.दरम्यान ६ जणांच्या पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटीव्ह आलेला आहे.
 आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी परिविक्षाधिन जिल्हाधिकारी विवेक जाॅनसन, तहसीलदार अनिलकुमार हेळकर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.सय्यद आदींशी चर्चा करून परिस्थितीचा व आवश्यक व्यवस्था याचा आढावा घेतला.आवश्यक सर्व व्यवस्था करून देण्याबाबत आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रशासनास आश्वस्त केले.सध्या बाधित रूग्णाच्या संपर्कातील २९ जणांना इन्स्टीट्यूशनल कोरोंटाईन केले असून ६ जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल सर्वांचे निगेटीव्ह आले आहेत.
तसेच सदर कोरोना बाधीत रूग्णाच्या सरणवाडी आणि ब्रम्हगाव या गावांना भेट देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांच्याशी चर्चा केली. ही दोन्ही गावे सील केली आहेत.
प्रशासनासह मी परिस्थितीवर लक्ष ठेवून पूर्ण खबरदारी घेत आहोत.जनतेने प्रशासनच्या सूचनांचे पालन करून घरीच राहून कुटुंबियांसह सुरक्षित रहा,असे आवाहन आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले आहे.
 
Top