परंडा /प्रतिनिधी : -
करोनाच्या लढाईत महाराष्ट्रात उस्मानाबाद जिल्हा वेगळा पॅटर्न निर्माण झाला असतानाच परंडा तालूक्यातील सरणवाडी येथील तीस वर्षीय तरुण करोना बाधीत पॉझीटीव्ह आला असल्याने संपूर्ण जिल्हा ग्रीनझोन मध्ये असताना काल मिळालेल्या रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला असल्याने आता जिल्हयात ग्रीन झोनला गालबोट लागले आहे.
 तालुक्यातील सरणवाडी येथील रुगणाचा काल सायंकाळी करोना बाधीत पॉझीटीव्ह आल्याचा अहवाल कळताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यानी सरणवाडीत तात्काळ धाव घेऊन गाव सील करण्यात आले आहे.
सरणवाडी येथील तीस वर्षीय तरुण हा मालवाहतुक करणारा असून स्वतःचे वाहनातून या भागातील शेतीमालाचे महानगरातील बाजार पेठेत माल वाहतूक करीत होता.काही दिवसापूर्वीच त्याने सोलापूर जिल्हयातील माढा तालूक्यातील एका शेतकऱ्याचे टरबूज घेऊन तो नवी मुंबईच्या बाजार पेठेत गेला होता.नवी मुंबई येथून परतल्यानंतर हा तरूण आजारी पडला होता.त्याने जवळच असलेल्या आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेतली तसेच रक्ताची चाचणी केल्यानंतर करोना बाधीत लक्षणे आढळून आल्याने त्यास दि.१० रविवार रोजी परंडा येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्याचे उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूर येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले असता काल दि.११ सोमवार रोजी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.ही बातमी समजताच महसूल विभागाने तात्काळ सरणवाडी येथे धाव घेत संपूर्ण सरणवाडी गाव सील करण्यात आले आहे. तसेच त्याच्या परिवारातील कुंटूब आई , वडील,पत्नी व त्याची भाच्ची या चार जणांना येथील आंबेडकर वस्ती गृहात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.तसेच त्याचे संर्पकात आल्याले सोळा जणांचा प्रशासना कडून शोध घेण्यात येत आहे.सोळा व्यतीरिक्त अजून कोण त्यांच्या संर्पकात आलेले आहेत त्याचा ही कसून शेाध प्रशासना कूडून घेण्यात येत आहे.तसेच येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात युवकावर ऊपचार चालू असून तो उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती चौकशी अंती मिळाली आहे. तसेच कालपासून सुरू केलेली बस सेवा व संपूर्ण बाजार पेठ आज सकाळपासून बंद करण्यात आले आहे. या युवकाचा अहवाल येण्यापूर्वीच आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक, पारिविक्षाधिन,ऊपजिल्हाधिकारी, येथील तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करुन सतर्कते बद्दल अवश्यक ती संपूर्ण माहिती घेऊन आमदार ठाकूर हे उदभवलेल्या परिस्थितीचा आढावा घेत असून खबरदारीची सुचनाही संबंधीतांना देत आहेत.वरील युवक करोना बाधीत पॉझीटीव्ह मिळाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
 
Top