नळदुर्ग/प्रतिनिधी-
तुळजापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी दि. ३१ मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे आपआपल्या घरातच मोठया प्रमाणात साजरी करावी असे आवाहन नळदुर्ग येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर  मध्यवर्ती जन्मोत्सव समीतीच्या वतीने सल्लागार पदमाकर घोडके यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात सध्या लॉकडाउन सुरु आहे, या लॉकडाउनमुळे राज्यात साजरे होणारे सर्व सण, उत्सव, जयंत्या, व इतर सर्व उत्सव समारंभावर बंदी घालण्यात आली आहे, यामुळे यावर्षी दि. ३१ मे राजी साजरी होणारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता तसेच जयंती निमीत्त कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करुन गर्दी न करता प्रत्येक समाज बांधवांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपआपल्या घरात अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करुन आपआपल्या घरात कुटूंबासह साजरी करावी असे आवाहन पदमाकर घोडके यांनी केले आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समीतीच्या वतीने गेल्यावर्षी लागवड केलेल्या व वर्षभर जतन केलेल्या १५ वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
 
Top