उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कोरोना पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी करण्यात आलेल्या  लॉकडाऊन च्या कार्यकाळात उस्मानाबाद जिल्हा कब्बडी असो. वतीने  घरी बसून कबड्डी प्रेमीसाठी जिल्हास्तरीय कबड्डी पंच शिबिराचे आयोजन zoom app च्या माध्यमातून करण्यात आले आहे.  या शिबीरास   दिनांक 1 जून 2020 पासून ठीक रात्री 7:30 पासून सुरूवात करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये कबड्डीच्या इतिहासापासून ते बदललेल्या नवीन व जुन्या  नियमाचे उजळणी करण्याच्या हेतूने जिल्यातील कबड्डीचे जाणकार  लक्ष्मण मोहिते, कदम फुलचंद,महादेव साठे तर महाराष्ट्र राज्यातील रवींद्र म्हात्रे, राजेंद्र अनभवणे, लक्ष्मण बेल्लाळे,  नवनाथ लोखंडे, भारत धनले यांचे मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबाराचे सूत्रसंचालन मोहन पाटील हे करणार आहेत
तरी जिल्हातील सर्व पंच व क्रीडा शिक्षक, कबड्डी प्रेमी  यांनी  zoom app आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलाडे करून घ्यावे व शिबिरात सहभागी व्हावे ,असे  आवाहन  असो. अध्यक्ष  बबनराव लोकरे ,  सचिव  महादेव साठे , लक्ष्मण मोहिते व सर्व असो. सदस्यांनी केले आहे.
 
Top