तुळजापूर / प्रतिनिधी-
 कोरोना रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनातर्फे तुळजापूर उपविभागात  कोरोना वाँरीयर्स दलाची  ची स्थापना करण्यात आली.आहे अशी माहीती उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना  दिवसेंदिवस वाढत आहे .त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यामध्ये कोरोना   येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र मेहनत करत आहे .परंतु जोपर्यंत या मोहिमेमध्ये नागरिकांचा सहभाग राहणार नाही तोपर्यंत पोलिस प्रशासन हे पूर्णपणे काम करू शकणार नाही.त्या अनुषंगाने तुळजापूर उपविभागातील. तामलवाडी ,नळदुर्ग आणि तुळजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामसुरक्षा दल तसेच जी व्यक्ती पोलीस  प्रशासनाला मदत करते अशा व्यक्तीचा कोरोना वारीयर्स  दल स्थापन करण्यात आला आहे व त्यांना पोलीस प्रशासनामार्फत ओळख पत्र देण्यात आलेला आहे. कोरोना वारीयर्स  हे कोरोना  प्रतिबंध करण्यासाठी गावामध्ये पेट्रोलिंग करतील ,गावामध्ये नाकाबंदी करतील तसेच पोलीस प्रशासनासोबत काम करतील. गावामध्ये एखादी नवीन व्यक्ती आल्यास तात्काळ प्रशासनास कळवतील तसेच गावांमध्ये  लोकांनी मास्क वापरावा, सामाजिक आंतर पाळावे याबाबत जनजागृती करतील. खरंतर कोरोना  म्हणजे लोकांनी लोकांच्या सुरक्षेसाठी सुरू केलेली मोहीम आहे.

 
Top