उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद पोलीस दलातील 7 सदस्यांना पोलीस महासंचालक यांचे मानचिन्ह प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध विभागांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना प्रति वर्षी महाराष्ट्र राज्य, पोलीस मुख्यालय, मुंबई तर्फे ‘पोलीस महासंचालक यांचे मानचिन्ह प्रदान केले जाते. सन-2019 करीता मानचिन्ह प्राप्त सदस्यांची नावे 30 एप्रिल रोजी जाहिर करण्यात आली. त्यात उस्मानाबाद पोलीस दलातील कैलास सर्जेराव लहाने, पोलीस उपनिरिक्षक-पौ.ठा. नळदुर्ग, श्रीनिवास संभाजी घुगे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक-तुळजापूर मंदिर चौकी, प्रदीप महादेव जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक-पो.ठा. तुळजापूर, सुकूमार गणपत बनसोडे, पोलीस हवालदार- पो.ठा. तुळजापूर, आत्माराम उत्तम जाधव, पोलीस हवालदार-पो.ठा. तुळजापूर, सुनिल अमृत कोळेकर, पोलीस हवालदार-पो.ठा. कळंब, रामेश्वर बापूराव उंबरे, पोलीस हवालदारपोलीस मुख्यालय, यांचा समावेश आहे. मानचिन्ह प्राप्त झाल्याबद्दल पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन व अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top