उस्मानाबाद/प्रतिनिधी - 
 उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे. हा ग्रीन झोन कायम ठेवायचा असेल तर, नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे आकाशवाणी वरून रविवारी सकाळी ११ वाजता समस्त जिल्हावासीयांना शपथ देणार आहेत.
शुक्रवारी ८ मे रोजी या संबंधी त्यांनी आदेश जारी केला आहे. आकाशवाणीच्या उस्मानाबाद सहक्षेपन केंद्रावरून त्या शपथ देणार आहेत. सामाजिक अंतर राखत आणि अन्य प्रतिबंधक नियमांचे पालन करत लोकांनी आपल्या घरून, घरातील अंगणातून, गच्चीतून, शेतातून किंवा जिथे असतील तिथून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
 
Top