उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधाेळ मुंडे यांनी आता आणखी एक नवीन आदेश काढला आहे. आता जिल्हयातील दुकाने दररोज सकाळी आठ ते दोन वाजेपर्यंत सुरू राहतील व या दरम्यान गर्दी टाळण्यासाठी बाजारपेठ व त्या रस्त्यावर चार चाकी वाहने नेहण्यास बंदी करण्यात आली आहे. रविवारी संपूर्ण मार्केट बंद राहील तसेच केवळ सोमवार ते शनिवार दररोज दुकान सुचित केलेल्या वेळेत उघडी राहणार आहेत.
हे आदेश 17 मे पर्यंत लागू असतील. उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून जिल्ह्याचा समावेश हा ग्रीन झोनमध्ये आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे परंतू बाजार पेठेत गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 
Top