उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील पाथर्डी येथे कोरोना बाधित दोन रुग्ण आढळल्याने गावास खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास घाडगे-पाटील यांनी भेट देऊन आवश्यक त्या उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या.
प्रामुख्याने रुग्णांवर स्थानिक पातळीवर तातडीने उपचार व्हावेत.पुणे- मुंबई वरून आलेल्या व्यक्तींना १४ दिवस शाळेत राहण्यासाठी व्यवस्था करावी व त्यांचे भोजन व्यवस्था करण्यात यावी. याबाबतचे नियोजन करावे.प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जाण्याऱ्या व आत येणाऱ्या व्यक्तींची यादी तयार करण्यात यावी, या झोनमधील लोक कामाशिवाय बाहेर जाता कामा नये. संबंधित अधिकारी यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सूचना दिल्या.
यावेळी कळंब-उस्मानाबाद चे आ. कैलास घाडगे-पाटील, उपविभागीय अधिकारी सौ अहिल्या गाठाळ मॅडम, जि.प जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे, ग्रामविकास अधिकारी श्री. राजगुरू, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
Top