उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 799 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी उस्मानाबाद तालुक्यातील 168, तुळजापूर 145, उमरगा 206, लोहारा 52, कळंब 145, वाशी 11, भूम 19, परंडा 53 अशा व्यक्तींच्या  स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 748 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 28 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 17 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत.  तसेच परंडा 1, कळंब 3 व उमरगा 2, येथील व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव्ह आलेले आहेत. लोहारा तालुक्यातील 1 अहवाल मुंबई येथे तपासणी करण्यात आलेला आहे. सदयस्थितीत 7 रुग्णांपैकी उमरगा व लोहारा येथील 3 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत व 2  रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे उपचार घेत आहेत तसचे 1 रुग्ण परंडा येथील उपजिल्हा रुग्णालायामध्ये उपचार घेत आहेत.  कळंब येथील 1 रुग्णांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून दि 15 मे रोजी शासकीय वैदयकीय महाविदयालय सोलापूर येथे पुढील उपचारसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

 
Top