तुळजापूर /प्रतिनिधी-
येथील युवा नेते  विनोद गंगणे यांनी शेतकऱ्यांचा पाच हजार किलो कांदा विकत घेवुन तो शहरातील गोरगरीबांना प्रत्येकी पाच किलो या प्रमाणे मोफत वाटप केला.
या मुळे शेतकऱ्यांचा  कांदा विकला गेला तर गोरगरीबांना कांदा मोफत मिळाल्याने या दोघांनाही दिलासा मिळाला आहे. आ.राणाजगजितसिंह पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर येथे सुरू असलेल्या अन्नदान उपक्रमांतर्गत श्री विनोद    गंगणे यांच्या वतीने जिजामाता नगर, तुळजापूर  भागातील प्रत्येक कुटुंबाला 05 किलो या प्रमाणे तब्बल 5000 किलो कांदा वाटप करण्यात आला.सदरील कांदा नगराध्यक्षा अर्चना विनोद गंगणे, प्रियंका विजय गंगणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला
 
Top