लोहारा/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या भीतीने आणि हाताला काम नसल्याने  आर्थिक अडचणीत सापडलेल्या तब्बल ४२ जणांनी एकाच दिवशी गावचा रस्ता धरला. गावातील काही नागरिक  मोलमजुरी करण्यासाठी मुंबई येथे गेलेले होते, त्यांनी गावात आल्याची कल्पना पोलीस पाटील तसेच उपसरपंच यांना दिली होती त्यांनतर त्यांची रीतसर नोंदणी करून प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन त्यांना गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यातील हातावर पोट असणाऱ्या २ कुटुंबातील ३२ जणांची व्यथा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ सुप्रिया टिके यांच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या मदतीने आरोग्य सदर गरीब मजुरांच्या जेवणाची तात्काळ व्यवस्था केली त्यानंतर हि बाब नारंगवाडी महसुल मंडळाचे मंडळ अधिकारी कोकणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील युवकांच्या  मदतीने सदर मजूरांच्या राशन, किराणा आणि भाजीपालाची व्यवस्था केली. कारण एकीकडे कामाचा ताण असताना देखील आरोग्य आणि महसुल कर्मचारी आपल सामाजिक दायित्व विसरले नाहीत याच विशेष कौतुक करण्यात येत आहे. यावेळी सिद्धेश्वर माने, अविनाश जाधव, शैलेश नागणे, दिनेश हांडे सतीश पाटील  परिचारिका नंदा गोसावी, आरोग्यसेवक बाळु जाधव, मिटकरी, आशा कार्यकर्त्यां अश्विनी वनकूद्रे, शोभा कांबळे सौ गायकवाड , यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
 
Top