तेर/प्रतिनिधी-
तहसीलदार गणेश माळी यांच्या सुचनेनुसार तेर ता. उस्मानाबाद येथील तलाठी कार्यालयाच्या वतीने गावातील दानशूर नागरिकांच्या सहकार्यातून २११ निराधार व गरजूं नागरिकांना ४०० किलो गहू , ६०० किलो तांदूळ , ६०० किलो  ज्वारी , ५० किलो साखर असे १६५० किलो धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव नाईकवाडी , तलाठी श्रीधर माळी , सरपंच नवनाथ नाईकवाडी , ग्रामविकास अधिकारी विजयसिंह नलावडे , भास्कर माळी , गोरोबा पाडूळे , विजय कांबळे , नारायण साळुंके , विलास पांढरे , आदि उपस्थित होते.
 
Top