कळंब (प्रतिनिधी) -
 शहर व परिसरात गढूळ व मातीमिश्रित पाणीपुरवठा होऊ लागल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करावा, घंटा गड्याचे वेळा पत्रक प्रत्येक प्रभा गात लावण्यात यावे अशी मागणी नगर सेवक सतीश टोणगे यांनी  मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.
या प्रकरणात पालिकेचे प्रशासन मात्र ढिम्म असून गढूळ पाणीपुरवठ्याची दखल पाणीपुरवठा विभागाकडून अद्याप घेण्यात आली नाही. शहरातील प्रत्येक भागात  घण साचलेली असून घंटा गाडी जात नाही, पाण्याचे व घंटा गाड्यांचे वेळा पत्रक कोल मडले असून , मूलभूत सुविधा कडे लक्ष नाही. मागण्यांची अमलबजावनी करण्यात यावी. अशी मागणी   सतीश टोणगे  यांनी केली आहे.
मांजरा धरणातील कमी होत जाणारी पाणीपातळी व त्यामुळे शहरात निर्माण झालेली पाणीटंचाई यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. जलकुंभ भरत नसल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहेत. अवेळी पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाण्याची वेळ सांभाळण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
दोन ऐवजी शहराच्या काही भागात चार दिवसांनंतर पाणीपुरवठा होऊ लागला आहे. अपुऱ्या व अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच आता त्यांना गढूळ पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कालपासून शहरात गढूळ पाणीपुरवठा होऊ लागला आहे. मातीमिश्रित अत्यंत खराब पाणी नागरिकांना मिळू लागले आहे. नळांना अचानकपणे गढूळ पाणी येऊ लागल्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

 
Top