उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
 सध्या देशभरात कोरोना जैविक विषाणूने थैमान घातले आहे. लाँकडाऊन मुळे जीवनमान विस्कळीत झाले असुन जिल्ह्याच्या सिमाहद्द बंदीमुळे अतिआवश्यक उपचारासाठी रुग्णांना उस्मानाबाद येथुन सोलापुर या इतर ठिकाणी जाता येत नाही यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे याबाबीकडे टायगर सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गौसभाई तांबोळी यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मित्रपरिवारांना सोबत घेवुन टायगर सोशल ग्रुप व अंजुमन हेल्थकेअर सोसायटीच्या माध्यमातून एकुण 35 जणांनी सोशल डिस्टंस व शासनाच्या सुचनांचे पालन करित रक्तदान करुन मानवहित जोपासले.
हा कार्यक्रम उस्मानाबाद येथीय भारत सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या सुरुवातीला गौसभाई तांबोळी यांना सह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक  दिग्गज दापके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यांनी शुभेच्छा मनोगतात रक्तदानाविषयी रक्तदात्यांचे आभार मानुन सध्याच्या कोरोना वायरसच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकांनी सामाजिक अंतर,तोंडाला मास्क बांधून घ्यावयाची काळजी बाबत नागरिकांना आवाहन केले.तर टायगर सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गौसभाई तांबोळी यांनी वाढदिवस नाममात्र आहे परंतु रक्तदान हे जरुरीचे आहे,देशातील परिस्थितीला अनुसरून रक्तदान म्हणजे जीवनदान आहे व ते आम्ही या माध्यमातून कर्तव्य पार पाडत आहोत असे मत व्यक्त केले तर अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोजभाई पल्ला यांनी सर्व आलेल्या मान्यवरांचे,रक्तदान शिबीरातील डाँक्टर, नर्स व सहकारी,पत्रकार बांधव यांचे आदर पुर्वक आभार मानुन सध्याच्या कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या आदेशाचे पालन करुन सहकार्य करावे हा आपला देश आहे, देश सुरक्षित आपण सुरक्षित असे मनोगत व्यक्त केले. यात प्रामुख्याने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  गजानन घाडगे,सह्याद्री फाऊंडेशनचे  दिग्गज दापके,सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे  गजानन पाटिल,गफारभाई शेख अन्य मान्यवर उपस्थित होते.यात योगेश अतकरे,आसेफ तांबोळी,निजाम नदाफ,महेश नेटके,बाळासाहेब सरवदे,आविनाश मुद्दे,हरि शिंदे, इकबाल शेख,इम्रान सय्यद,यांच्या सहित अन्य इतरांनी रक्तदान केले.

 
Top