उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 जिल्हयातील सर्व शेतकरी बांधवाना महाराष्ट्र शासनाने दि. 27 डिसेंबर, 2019 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील शेतकऱ्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. या योजनेअंतर्गत दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी 519 गावातील 5 हजार 470 पात्र लाभार्थ्यांची तिसरी यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. आज अखेर एकूण 66 हजार 727 लाभार्थी शेतकऱ्याच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी  दि. 4 एप्रिल 2020 पर्यंत 54 हजार 285 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. तर 12 हजार 442 शेतकऱ्याचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी 51 हजार 970 शेतकऱ्याचे कर्जखात्यावर 384 कोटी 79 लाख रुपये जमा करण्यात आलेली आहेत. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने चालू आहे. शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे अनिवार्य आहे.
 ज्या शेतकऱ्यानी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांनी सामाजिक अंतर (Social Distance) चे पालन करुन आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेशी संपर्क साधावा आणि आपले आधार  प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आधार प्रमाणिकरण प्रक्रिया दरम्यान कर्जखाते रकमेत कोणतीही तफावत असल्यास रक्कम अमान्य पर्याय उपयोगात आणण्यापूर्वी आपल्या बँक शाखेशी संपर्क साधून कर्जरकमेची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उस्मानाबाद व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top