उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जागतिक परिचारिका दिनानिमित्त बेंबळी येथील सर्व परिचारिकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जीवाची पर्वा न करता आरोग्य विभागातील परिचारिका व आरोग्य कर्मचारी दिवसरात्र सेवा बजावत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनोज दादा चव्हाण सामाजिक संस्कृतिक कला व बहुउद्देशीय संस्था रुईभरच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
१२ मे रोजी दरवर्षी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. १८५४ मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांवर उपचार करणाऱ्या आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय काका दळवे, तसेच सामाजिक कार्यकर्ते आकाश भैय्या चव्हाण ,संतोष चव्हाण, तसेच वैद्यकीय अधिकारी अमोल सूर्यवंशी, आरोग्य सहाय्यक काका वाघमारे ,एम.एच. कोल्हाळ, आरोग्य सेवक जी.एस.भोसले, शिव शंकर कांबळे,किरण देडे, आरोग्य सेविका जे.एन  राऊत, आय.बी. पठाण, एस.एम स्वामी.
 आदींची उपस्थिती होती. 
 
Top