उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यातील मागील महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व काही भागात गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रामुख्याने भूम व परंडा तालुक्यासह जिल्हयातील अनेक गावात द्राक्ष , आंबा, केळी, मोसंबी इत्यादी फळबागांचे नुकसान झाले आहे.
जिल्हयातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या संपूर्ण नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने पाहणी करून तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांना पत्रा द्वारे विनंती केली.

 
Top