उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून सामुदायिक हत्या ,बलात्कार ,खून इत्यादी घटनेमध्ये प्रचंड वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली आहे. राज्याच्या गृह खात्यावरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडालेला आहे .स्वतःला झेपत नसलेल गृहमंत्रीपद अनिल देशमुख यांनी घेतले असून त्यावर त्यांचं कसलेही नियंत्रण नाही .कोरूना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरच सातत्याने हल्ले होत आहेत .गृहखात्यावर त्यांचा कसलाही वचक राहिला नसल्यामुळेच लोकांत कायद्याची भीतीच उरली नाही .त्यामुळे आता अनिल देशमुख यांना ग्रह  मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे ग्रह मंत्रीपदाची जबाबदारी घेण्याची मागणी जनता दल सेक्युलर चे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे .गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून राज्याच्या गृह खात्यावरील सर्वसामान्य जनतेचा विश्वास उडाला आहे. पालघर येथे दिवसाढवळ्या साधूची हत्या करण्यात आली तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांनी आपल्या स्वतःच्या घरी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत तरुणाला बोलावून घेऊन बेदम मारहाण केली. अशा प्रकारच्या अनेक घटना राज्यात दिवसेंदिवस घडत आहेत .ज्या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत तेथे जनसामान्यांचा वाली कोण आणि ही सर्व गुंडगिरी राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते माजवत आहेत कारण त्यांना सत्तेचा माज चढलेला आहे व आपल्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही याची त्यांना खात्री वाटत आहे .गृह खात्याचा कारभार अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांना विचारुन करण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षांना विचारून कारभार हाकत आहेत. दिवसेंदिवस महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट होत असून सर्वसामान्य जनता व महिलांमध्ये  असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गृहमंत्रीपद स्वतःकडे ठेवणाऱ्या अनिल देशमुख यांना पोलीस यंत्रणा कार्यक्षम ठेवून सर्वत्र दक्षता वाढविण्यास तसेच गुन्हेगारी रोखण्यात पूर्णपणे अपयश आले आहे .गेल्या 40 दिवसापासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी चालू आहे. त्यातच कष्टकरी कामगार, मजूर व गोरगरिबांच्या हाताला काम नसल्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा भडका उडाला आहे ,
अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्या ऐवजी दिवसेंदिवस गृह खात्याच्या निष्काळजीपणामुळे बिघडत चाललेली आहे त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्याकडे ग्रह खाते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ काढून घेण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.

 
Top