उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून उस्मानाबाद जिल्ह्यातील दारू विक्रीची दुकाने ही आठवड्यातील केवळ ३ दिवसासाठी सुरु करण्यात येणार आहेत.आठवड्यात सोमवार, बुधवार व शुक्रवार या ३ दिवसासाठी सकाळी १० ते १ या ३ तासाच्या वेळेत ही दुकाने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीतील मॉल्स, बाजार संकुल व बाजारातील मद्य विक्री दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्यविक्री दुकाने वगळून वाईनशॉप, बिअर शॉपी, देशी दारू किरकोळ विक्री दुकाने ४ मे पासून सुरू होणार असली तरी याचा प्रत्यक्ष लाभ हा ६ मे पासून मिळणार आहे त्यामुळे तूर्तास तरी याचा लाभ २ दिवसांनी मिळणार आहे. दारू खरेदी करताना मास्क व फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. एका वेळी दुकानासमोर ५ पेक्षा अधिक व्यक्ती समोर असणार नाहीत शिवाय दोन व्यक्तीतील अंतर हे किमान ६ फूट इतके ठेवणे बंधनकारक आहे. दारू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे थर्मल सकॅनिंग करण्यात येणार असून सर्दी, ताप व खोकला ही लक्षणे आहेत अश्या व्यक्तींना दुकानात प्रवेश नसणार आहे.

 
Top