कळंब /प्रतिनिधी  -
कळंब तालुका शिवसेनेच्या वतीने  अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे अन्नछत्र कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन कालावधीपर्यंत अविरत चालू राहणार आहे आज उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश निबांळकर व आमदार कैलास घाडगे - पाटील  यांनी अन्नछत्रस भेट दिली त्याच्या हस्ते  दि. 08 रोजी गरजूवंताना भोजन वाटप करण्यात आले.
 या प्रसंगी शिवसेना तालूका प्रमुख शिवाजी (आप्पा) कापसे, शहर प्रमुख प्रदिप मेटे ,युवासेना शहर प्रमुख गोविंद चौधरी , शिवसेना उपशहर प्रमुख अॅड . मंदार मुळीक  शिवसेनेचे नगरसेवक मुस्ताक खुरेशी, अनंत वाघमारे ,सौ . मिराताई चोन्दे, सौ . अश्विनी शिन्दे माजी नगर सेवक सुनिल गायकवाड, सुरेश शिन्दे ,  बापू जोगदंड , अनिल बोबडे , निर्भय घुले,शिवाजी सिरसट व शिवसैनिक हजर होते.
 
Top