उस्मानाबाद/प्रतिनिधी-
देशात कोरोना जैविक विषाणुचे संकट असुन सर्वत्र लाँकडाऊन आहे.अत्त्यावश्यक सेवेसाठी शासकीय कार्यालयात नागरिकांची आवक जावक आहे.सुरक्षिततेसाठी सँनिटायझर असणे गरजेचे आहे.. शासनाने याची सुविधा तर केलीच आहे परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून सुमैय्या साडी सेंटरचे मालक सत्तार मोमीन यांनी दहा सँनिटायझरचे फुट प्रेस स्टँण्ड शासकीय कार्यालयासमोर आज रोजी उपलब्ध करुन दिले .
शहरातील  जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा पोलीस मुख्यालय, शहर पोलीस स्टेशन, जिल्हा शासकीय रुग्णालय, सामाजिक न्याय भवन, महिला रुग्णालय, शासकीय मध्यवर्ती ईमारत, आनंद नगर पोलीस स्टेशन, नगर परिषद या ठिकाणी हे सँनिटायझर फुट प्रेस स्टँण्ड लावण्यासाठी दिले. सामाजिक सुरक्षिततेच्या कार्यक्रमात तहसीलदार गणेश माळी,डिवाएसपी मोतीचंद राठोड,नायाब तहसीलदार मुस्तफा खोंदे,नगराध्यक्ष मकरंद भैय्या राजे निंबाळकर,आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. शकिल अहेमद खान,शहर पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,नगरसेवक अक्षय ढोबळे,नगरसेवक खलीफा कुरेशी,अंजुमन हेल्थकेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फेरोजभाई पल्ला,अंसार रजवी,इम्रान मोमीन,फिरोज पठाण,गजानन पाटील,काकडे,अन्य मान्यवर उपस्थित होते.विशेष म्हणजे कोरोना संकटात अंजुमन हेल्थकेअर सोसायटीने अनेक उपक्रम राबविले असुन हा उपक्रम हि त्यांच्याच पुढाकारातून समोर आला असुन यासाठी फेरोजभाई पल्ला यांचे नियोजन होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार गणेश रानबा वाघमारे यांनी केले.
 
Top