कळंब / प्रतिनिधी -
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे, दोन टप्प्यातील लॉक डाऊन आज पूर्ण होऊन उद्या पासून तिसरा टप्पा सुरु होईलत्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी पुकारलेल्या "जनता कर्फ्यू" च्या पार्श्वभूमी वर कळंब शहरात दि. 03 मार्च रोजी पोलिसांचे पथ संचलन झाले, या पथसंचलनाच्या वेळी कळंब शहरातील सर्व  चौकात पोलिसांच्या शिस्तबद्ध ताफा आल्यानंतर नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून टाळ्या वाजवल्या आणि या कोरोना योध्यांच  अभिनंदन केले.
     या मध्ये पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्यासह पोलीस कर्मचारी दंगल नियंत्रक पथक उस्मानाबाद चे महिला पुरुष कर्मचारी उपस्थित होते.
 
Top