नळदुर्ग /प्रतिनिधी-
जागतिक परिचारिका दिनानिमीत्त झालेला आमचा सत्कार हा सत्कार नसून तो एक भावांकडून झालेला आमचा एक बहूमान आहे, असे मत नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका  सौ. सुमन फुले यांनी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले. दि. १२ मे रोजी जागतिक परिचारीका दिन साजरा करण्यात आला आहे.
सध्याच्या कोरोनाच्या संकटात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता परिचारीका कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करीत आहेत, त्यांच्या या कार्याला खरेच तोड नाही. कोरोना रुग्णांवर उपचार करीत आसताना अनेक परिचारीकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर कांही परिचारीकांचा या मध्ये दुर्दैवाने मृत्यूही झाला आहे. दि. १२ मे रोजी संपूर्ण जगात जागतिक परिचारीका दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे. या जागतिक परिचारीका दिना निमीत्त नळदुर्ग येथील नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असणारे नगरसेवक विनायक अहंकारी यांनी नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी डॉ. नरवडे, पत्रकार विलास येडगे हे उपस्थीत होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारीका सौ. सुमन फुले, सीमा फंड, अश्वीनी शेरखाने, रमा घोनाळे, आरोग्य कर्मचारी जाधव, बडूरे, संगीता उकींडे व तेजस्वी जाधव यांचा नगरसेवक विनायक अहंकारी यांच्याकडून डॉ. नरवडे, पत्रकार विलास येडगे, व स्वत: विनायक अहंकारी यांनी साडी, पूष्पहार, देवून त्यांचा गौरव केला. प्रारंभी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी म्हटले की, हा परिचारीकांचा सत्कार नसून एका भावाकडून बहीणीची ओटी भरल्यासारखे आहे, परिचारीकांचा कार्याला मोल नाही. त्यांच्या कार्याचे मोजमाप होवू शकत नाही, इतके परिचारीकांचे कार्य मोठे आसल्याचे विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना सुमन फुले यांनी म्हटले की, या सत्काराने आम्ही इतके भारावून गेलो आहोत, अशीच कौतुकाची थाप व प्रेम आमच्या पाठीशी रहावे असे ही त्यांनी यावेळी म्हटले आहे. यावेळी डॉ. नरवडे यांनी मार्गदर्शन केले.

 
Top