तुळजापूर /प्रतिनिधी -
सोलापूर तुळजापूर रस्त्यावर असणा-या घाटशिळ घाटाच्या पायथ्याशी आरटीओच्या अधिका-यांनी परप्रांतीय मजुरांना घेऊन चाललेल्या ट्रकवर कारवाई करत एकुण ७० मजुरांना ताब्यात घेतले आहे.
सध्य परिस्थितीत परप्रांतीय आपल्या गावी जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. रविवार दिनांक 17 रोजी दुपारी 3 वा. तुळजापूर येथील घाटाच्या पायथ्याशी सोलापूर हुन येणा-या ट्रक ( एच.आर.73 ए 8177) हा बेंगलोर हुन 70 मजूर घेऊन छत्तीसगढ कडे जात असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे आरटीओ अधिकारी गजानन नेरपगार, मिलिंद खानोरे ,अतुल नांदगावकर, प्रशांत भांगे हे सर्व मोटार वाहन निरीक्षक यांनी दुपारी 3 च्या सुमारास हा ट्रक संशयास्पद वाटल्यामुळे त्यांना अडवून चौकशी केली असता या ट्रकमध्ये सुमारे 70 परप्रांतीय मजूर या मधुन प्रवास करत होते. त्यांना तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी नेण्यात आले .तसेच या मजुरांची हाल होऊ नये म्हणून आरटीओ अधिकारी यांनी त्यांच्या राहण्याची व भोजनाची सोय कार्यालयामार्फत केली आहे. त्यांची तपासणी करून त्यांच्या गावी एसटी महामंडळाच्या मार्फत बस ने त्यांची रवानगी केली जाणार आहे. अशी माहीती  तुळजापूर आगार प्रमुख राजकुमार  दिवटे  यांनी दिली.

 
Top