नळदुर्ग/प्रतिनिधी-
गुळहळळी (ता. तुळजापुर) येथील रास्तभाव दुकानदार श्री व्ही. ए.घोडके यांचे रास्तभाव दुकान जिल्हा पुरवठा अधिकारी धाराशिव यांनी निलंबित केले आहे. या दुकानाची पर्यायी व्यवस्था शहापुर येथील रास्तभाव दुकानदार एस. एस. काळे यां‘याकडे केली आहे.
गुळहळ्ळी येथील रास्तभाव दुकानदार श्री व्ही.ए.घोडके यां‘याबाबत गुळहळळी येथील शिधापत्रिकाधारकां‘या असंख्य तक्रारी होत्या. या तक्रारीची दखल घेऊन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या दुकानाची चौकशी केली असता यामध्ये गंभीर दोष आढळुन आल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्यांचे दि.14 मे 2020 चे आदेशानुसार दुकानाचे प्राधिकार पत्र निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश तुळजापुर तहसिलदार यांनी बजावले आहेत.गुळहळळी येथील व्ही.ए.घोडके यां‘या दुकानांशी जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होऊ नये याकरीता त्यां‘या रास्तभाव दुकानाची पर्यायी व्यवस्था अन्य रास्तभाव दुकानाकडे सोपवने आवश्यक आहे त्यामुळे गुळहळ्ळी येथील रास्तभाव दुकानाची पर्यायी व्यवस्था नजीकचे रास्तभाव दुकान शहापुर येथील रास्तभाव दुकानदार एस. एस. काळे यां‘याकडे पुढील आदेशपर्यंत सोपविण्यात येते त्यांनी त्याचे रास्तभाव दुकानाचा धान्य कोठा उचल करून ई पोस मशिनद्वारे शिधापत्रिकाधारकांना वाटप करावे ,असे तहसिलदारांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

 
Top