उस्मानाबाद/प्रतिनिधी-
आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या सौजन्याने जिल्ह्यातील सर्व आशा कार्यकर्तींना सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्ही.वडगावे आणि जिल्हा आशा समूह संघटक श्री.सतीश गिरी यांच्याकडे सॅनिटायझर व मास्क सुपूर्द करण्यात आले.
यावेळी जि.प.चे बांधकाम सभापती श्री.दत्ता देवळकर, जि.प.सदस्य माऊली राजगुरू, जि.प.सदस्य संदीप पापा मडके, निलेश शिंदे उपस्थित होते.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवलंबिलेल्या उपाययोजना राबवित असताना आशा कार्यकर्तींना महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, व ही जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडत आहेत.
ऑडिओ ब्रीज च्या माध्यमातून  संवाद साधत असताना आशा कार्यकर्तींनी सॅनिटायझर व मास्क मिळणेबाबत आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्याकडे विनंती केली होती. कोरोना (Covid - 19) चे संक्रमण रोखण्यासाठी मास्क व सॅनिटायझर चा वापर आवश्यक आहे. त्यामुळे आ.राणाजगजितसिंहजी पाटील साहेब यांनी जिल्ह्यातील सर्व आशा कार्यकर्तींसाठी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिले.
आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या वतीने जि.प.अध्यक्षा सौ.अस्मिता कांबळे, बांधकाम सभापती श्री.दत्ता देवळकर, जि.प.सदस्य माऊली राजगुरू, जि.प.सदस्य संदीप पापा मडके यांच्या हस्ते सॅनिटायझर व मास्क आरोग्य विभागाकडे सुपुर्द करण्यात आले.जि.प.च्या आरोग्य विभागामार्फत सदरील मास्क व सॅनिटायझर सर्व आशा कार्यकर्ती पर्यंत पोहोंचविले जाणार आहेत.
 
Top