तेर( प्रतिनिधी ) कोळेवाडी ता उस्मानाबाद येथे गावाजवळ असलेल्या गोठ्यास वीजेच्या ताराचे घर्षण होऊन लागलेल्या  आगीत  शेतकऱ्यांचे सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले ही घटना 2 मे रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास  कोळेवाडी ता. उस्मानाबाद येथे घडली.
  कोळेवाडी येथील शेतकरी नारायण आकोसकर यांची गावाजवळ  असलेल्या शेतातील कोठ्यास महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांचे एकमेकांना घर्षण होऊन ठिणग्या पडून कोठ्यास आग लागली. यामध्ये कोठ्यात असलेले वायर, तूर व सोयाबीन चे कट्ठे,  बैलगाडी व शेतीपयोगी अवजारे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे  70 हजार रूपयाचे नुकसान झाले यावेळी कोठ्यास आग लागल्याचे कळताच गावातील नागरिकांनी आगीच्या दिशेने धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या घटनेचा महसूल प्रशासणाने झालेल्या  नुकसानीचा पंचनामा केला आहे.
 
Top