उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावात कोरोना या आजारा विषयी गावातील नागरिकांनी कोणती काळजी घ्यावयाची आहे. कोण-कोणत्या गोष्टींपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे? गावात बाहेरून व अन्य परराज्यातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करने, तसेच गावाअंतर्गत कोणत्या उपाययोजना करने आवश्यक आहे ? आदी विविध प्रश्नासंदर्भात गावातीलच ज्येष्ठ पत्रकार उपेंद्र कटके ग्रामस्थांना फेसबुक माध्यमातून आज गुरूवार  २१ रोजी सांयकाळी ठिक ८ वाजता लाईव्ह मार्गदर्शन करणार आहेत .  बेंबळी विकास चर्चा या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम होणार आहे.
या मार्गदर्शनाचा गावातील  ग्रामस्थांनी, युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक रणजीत बरडे यांच्याकडून करण्यात येत आहे.

 
Top