उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यातील वीजपुरवठा करणा-या महावितरण उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुरुस्त करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
लातूर येथील महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील नळदुर्ग, शेळगाव, शिराढोण येथील उपकेंद्रातून शेजारील गावांना वीजपुरवठा करणा-या उपकेंद्रातील पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. या परिसरातील वीजपुरवठा बंद आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होत आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाच एमव्हीए ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुरुस्त करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याची दखल घेवून हे ट्रान्सफार्मर दुरूस्त करावेत असे निवेदनात म्हटले आहे.
 
Top