उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तालुक्यातील तेर येथे अवकाळी पावसामुळे व वादळामुळे मजूर राजू मेंगले यांच्या घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच आई जखमी झाल्या आहेत. यामुळे शनिवारी उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघाच्या वतीने मेंगले कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
तेर येथील खूप वर्षापूर्वीचे पिंपळाचे झाड असल्यामुळे कमकुवत झाले होते. यामुळे ते मेंगले यांच्या घरावर वादळात पडले. यामध्ये घर पूर्णपणे कोसळले आहे. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. सरपंच व तलाठी यांना तत्काळ पंचनामे करून घेण्याची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत लवकरच झाड तोडु असे ग्रामसेवक यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, दादासाहेब घोडके, उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्ष सतीश उर्फ बंटी मेंगले आदी उपस्थित होते. यावेळी समाजातील दानशूर व्यक्तींनी मेंगले यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी आर्थिक मदत करावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रवी कोरे यांनी केले आहे.
 
Top