उस्मानाबाद /प्रतिनिधी-
कोरोना विषाणू (COVID-19) या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्याबाबत भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या Management Of Suspect Confirmed Cases of COVID-19 मधील मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यान्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 33 आणि 65 अन्वये जिल्हयातील 14 ठिकाणी आरोग्य विभागच्या अधिनस्त कोविड केअर सेंटर (CCC) म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहेत. सद्य:स्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने रुग्णांची प्राथमिक तपासणी व त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास तात्काळ पुढील उपचार होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी (THO) व वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय (MS) या दोन अधिकारी व त्यांच्या यंत्रणा यांच्यावर वरील कोविड केअर सेंटरच्या यशस्वी संचलनासाठी खालील प्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.
कोविड केअर सेंटरची (CCC) कार्यपध्दती
 जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी (THO) व वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय (MS) यांनी पार पाडावयाची जबाबदारी पुढीलप्रमाणे आहे.
1. तालुका आरोग्य अधिकारी हे कोविड केअर सेंटरसाठी वैद्यकीय अधिक्षक यांना सहाय्यक म्हणून काम पाहातील. वैद्यकीय अधिक्षक हे कोविड केअर सेंटरचे प्रमुख राहातील. तालुका आरोग्य अधिकारी (THO) यांचेकडून प्राप्त स्टाफला आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटरसाठी शिफ्टनिहाय ड्युटीचे नियोजन करणे व आदेश काढणे.
2. कोविड केअर सेंटरसाठी वैद्यकीय अधिक्षक यांचे मागणी प्रमाणे डॉक्टर, परिचारिका, नर्सेस इत्यादी मनुष्यबळ पुरवणे. वरील सर्वांना आवश्यक योग्य ते प्रशिक्षण देणे. वैद्यकीय अधिक्षक यांनी स्वत: व इतर वैद्यकीय अधिकारी यांनी दैनंदिन प्रत्येक कोविड केअर
   सेंटरला भेटी देणे.
3. कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे, यंत्रे, सोयी-सुविधा इत्यादीचा वैद्यकीय अधिक्षक यांचे मागणी प्रमाणे पुरवठा करणे. सर्व स्टाफसाठी आवश्यक सुरक्षा किट व उपकरणे (Sainitizer,Gloves,Mask) उपलब्ध करुन देणे आवश्यकतेनुसार तालुका आरोग्य अधिकारी यांचे कडून प्राप्त करुन घेणे.
 4.सर्व स्टाफसाठी आवश्यक सुरक्षा कीट व उपकरणे (Sainitizer,Gloves,Mask) उपलब्ध करुन देणे. बायोमेडिकल वेस्ट, स्वच्छता, आहार या बाबतची संहिता काटेकोरपणे पाळणे.  रुग्णांचे Contact  Tracing व क्षेत्रीय पातळीवरील सर्व कामाची जबाबदारी तालुका अधिकारी यांची असेल. काही अडचणी आल्यास गटविकास अधिकारी, तहसिलदार व वरिष्ठांच्या समन्वयाने तात्काळ सोडविणे.
5. कोविड केअर सेंटरसोबत शहरी व ग्रामीण भागातील Containment Plan तयार करणे व  Incident Commander यांना सर्वोतोपरी  मदत करणे. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांचा उपचार व इतर कोणत्याही  बाबतीत गैरसोय होणार नाही याची दक्षता घेणे.
  वरीलप्रमाणे कोविड केअर सेंटर (CCC) संबंधित जबाबदाऱ्या व कार्यपध्दतीनुसार अपेक्षित कार्यवाहीवर सनियंत्रण ठेवण्याची अंतिमत:जबाबदारी ही नोडल अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक उस्मानाबाद व जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.उस्मानाबाद यांची संयुक्तपणे राहील. ही कार्यवाही परस्पर समन्वयाने व काटेकोरपणे पूर्ण करावे. तसेच भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या Management of suspect/confermed Casese of COVID-19 मधील मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. COVID Care Center (CCC) येथे या संदर्भात कुठेही निष्काळजीपणा किंवा रुग्णांची हेळसांड, गैरसोय, उपचार न होणे या बाबीं निदर्शनास आल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती अधिनियम 2005 चे कलम 56 अन्वये तात्काळ कारवाई करण्यास पात्र ठरतील.
 
Top