उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील 2 रुग्णाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉराजाभाऊ गलांडे यांनी दिली.
काल वाशी येथील पिंपळगाव येथे 6 वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली होती त्या मुलीच्या आई व वडिलांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा 25 झाला आहे, त्यापैकी 4 रुग्ण बरे झाले असून 21 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, आई वडील व मुलगी हे सर्व तिघे जण मुंबई येथून आल्याचे समोर आले असून त्यांच्या संपर्कातील लोकांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवणयात येत असून पिंपळगावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. काल मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता तर आई वडील यांचा अहवाल इनकनक्लुसीव्ह प्रलंबित होता तो आज प्राप्त झाला असून पॉझिटिव्ह आला आहे.
 
Top