उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध बाल गृह तील बालकांना  भूम, परंडा, वाशी मित्रमंडळ यांचे कडून  बालकल्याण समितीचे समन्वयातून दोन महिने पुरेल येवढे गहु, तांदूळ, डाळ, साबण, तेल, मिरची पाउडर, इ. साहित्य मोफत उपलब्ध करून दिले. सदर साहित्य तहसीलदार माळी यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष  डॉ. अश्रुबा कदम, सदस्य नंदकिशोर कोलगे, डॉ मोटे,  मित्रमंडळाचे सुरेश कवडे,  नायब तहसीलदार फोंदे ईत्यादी हजर होते.  याबद्दल जि.म. बा. वि. अ. चे  बी.एच निपाणीकर यांनी मित्रमंडळाचे व समितीचे आभार व्यक्त केले.

 
Top