तुळजापूर /प्रतिनिधी-
कोरोना लाँकडाऊन पार्श्वभूमी  तुळजापूर परिसरात सापडलेले अडकलेले व शासनाच्या शेल्टर होम मधील  एकुण 179 परप्रातीयांना महसुल प्रशासनाने त्यांच्या गावी रेल्वेने पाठवले. यात तामिलनाडू, उत्तरप्रदेश, जम्मु कश्मीर मधील लोकांचा समावेश आहे. यातील काही कामगार असुन काही अन्य लोंगोचा  समावेश  आहे.
यात शाषणाचा शेल्टर होम मधील तामीलनाडू येथील 36 लोकांना पंढरपूर रेल्वे स्टेशन वरुन तामिलनाडू येथे पाठवले तसेच दि. १२.०५.२०२० रोजी उत्‍तरप्रदेशातील ३९ लोकांना तुळजापूर वरुन औरंगाबाद रेल्‍वेस्‍टेशन येथे राज्‍य परिवहन च्‍या बस ने पाठविण्‍यात आले व  दिनांक १३.०५.२०२० रोजी उत्तरप्रदेशातील ८८ लोकांना औरंगाबाद रेल्वे स्टेशन व जम्मु कश्मीर मधील १६ लोकांना नागपूर रेल्वेस्टेशन येथे पाठविण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संदीप जाधव हे उपस्थितीत होते.
 
Top