तुळजापूर/प्रतिनीधी
 तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील रहिवासी पण नवी मुंबई येथे कामास असलेल्या  तिघा जणांचा कोरोना अहवाल बुधवार दि.27 रोजी  पाँजीटीव्ह आला. तुळजापूर तालुक्यातील रहिवासी असलेले पण नवी मुंबई - पुर्णे रिर्टन  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता  चारवर,पोहचली आहे.तुळजापूर येथील कोरोना  रुग्णालयात चार तुळजापूर तालुक्यातील व दोन लोहारा तालुक्यतील कोरोना पाँजिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, हे पाच जणांचे  कुंटुंब  नवी मुंबई हुन पाच दिवसापुर्वी तुळजापूरला आले होते ते गावाकडे जाण्यापुर्वी  त्यांचे स्वँब घेवुन तपासणीस पाठवले असता  त्याचे रिपोर्ट आज पाँजिटीव्ह आले आहेत. ही  मंडळी  गावी गेली असती तर माञ प्रशासनाची  मोठी डोकेदुखी वाढली असती  माञ प्रशासनाने  वेळीच दक्षता घेतल्याने मोठा अनर्थ टळला. यात दोन पुरुष , एक स्ञी चा समावेश आहे  यांच्या बरोबर आणखी दोघे जण होते त्यांना क्वारटांईन मध्ये ठेवल्याचे समजते. सदरील मंडळी ब-याच वर्षापासुन  नवी मुंबई येथे जगावयास गेली होती हे गावी कधीतरी येत असत माञ  नवी मुंबईत कोरोना प्रादुर्भाव वाढताच तिथे हाताला काम नसल्याने ते गावी आले होते त्यांना थोडी शेती असल्याचे समजते. कार्ला गावचे तिघे कोरोना पाँजिटीव्ह आल्याचे समजताच प्रशासकीय अधिकारी वर्गाने कार्ला गावास भेट देवुन पाहणी करुन ग्रामस्थांना दक्षता घेण्याचे आवाहन केले.
 
Top