तुळजापूर/प्रतिनीधी
तालुक्यातील मौजे तडवळा येथील  चौपदरी रस्त्यावर असणा-या बायपास ब्रिजवर जाण्या-येण्यासाठी रस्ता करावा या मागणी चे निवेदन  तडवळा ग्रामस्थांनी तहसिलदार यांना दिले आहे
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,  तुळजापूरच्या बाह्य भागातुन लातूर -नळदुर्ग -सोलापूरला जाण्यासाठी बाह्रय बायपास  चौपदरी रस्त्याचे काम चालु आहे. या रस्त्या करीता मौजे तडवळा गावाकडे जाणाऱ्या जुन्या  मुख्य येथील रस्त्यावर तडवळा गावानजीक ब्रिज बांधकाम सुरु आहे. या ब्रिजची उंची अतिशय कमी असल्याने या ब्रिज खालुन ऊस कांदा  सह अन्य शेतमाल  वाहने  जावु येवु शकणार नाहीत तसेच  बोअर च्या गाड्या जड वाहने तडवळा गावात येवु शकणार नाहीत यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड अर्थिक नुकसान होवुन त्यांना प्रचंड ञासास सामोरे जावे लागणार  आहे. तरी चौपदरी रस्त्यावर जाण्या-येण्यासाठी रस्ता करावा जेणे करुन ग्रमस्थांना संभाव्य होणारा ञास वाचणार आहे, तरी याची दखल शाासनाने  घ्यावी अशा आशयाचे निवेदन  देण्यात आले आहे. 
 
Top